सांजवार्ता
Page No.: 3 Date: 29/11/2026
विद्यापीठ आवारात भीतीचे वातावरण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आवारातील ऐतिहासिक सोनेरी महल परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि. २८) उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसर, लगतचा बौद्ध लेणी भाग आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या भागात वन
हालचालींवर लक्ष
सोनेरी महालाच्या मागील गायरान जमिनीवर गुरे चरत असताना बिबट्याने एका जनावरावर हल्ला केल्याचे गुराख्यांनी पाहिले. आरडाओरड झाल्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. माहिती मिळताच आमच्या पथकाने घटनास्थळी जाऊन शोधमोहीम राबवली. दाट जंगल असल्याने बिबट्या एकाच ठिकाणी दिसणार नाही; मात्र आम्ही गस्त वाढवून हालचालींवर लक्ष ठेवून आहोत.
विभागाची गस्त वाढवण्यात आली आहे. बिबट्या एकाच ठिकाणी स्थिर राहत नसल्याने तो लगतच्या इतर भागांतही जाण्याची शक्यता आहे; त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केले आहे. मागील बाजूला असलेल्या गायरान जमिनीवर नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी गुरे चरण्यासाठी गेली होती. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका वासरावर अचानक झडप घातली. मोठा आवाज झाल्याने बिबट्याने शिकार सोडून लगतच्या जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
फाईल चित्र
सागर कुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














